बायोफ्यूलसर्कलने बायोएनर्जी सप्लाय चेनसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या प्लॅटफॉर्मने शेतकरी, ग्रामीण उद्योग, आणि बायोमास प्रक्रिया करणाऱ्यांना, फॉसिल फ्यूलच्या जागी सस्टेनेबल फ्यूलचा वापर करू इच्छिणाऱ्या उद्योगांशी जोडून, एक अनोखी “फार्म टू फ्यूल” इकोसिस्टम निर्माण केली आहे. बायोफ्यूलसर्कलने भारताचे ऊर्जा संक्रमण वेगवान करण्यासाठी अग्रणी मध्यस्थ बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
आम्ही भारतात एक प्रगत आणि डिजिटल पद्धतीने चालवलेली बायोएनर्जी सप्लाय चेन प्रस्थापित करण्यामध्ये अग्रणी आहोत. आम्ही केवळ बायोएनर्जी सप्लाय चेनच्या सर्व समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत नाही, तर आपल्या आसपासच्या अर्थव्यवस्था, जनसामान्य आणि पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम घडवून आणत आहोत.
बायोफ्यूलसर्कल “फार्म टू फ्यूल” इकोसिस्टममध्ये नवीन संधी निर्माण करून व्यवसायांना वाढण्यास मदत करत आहे. आम्ही एक वर्तुळाकार अर्थव्यवस्था तयार केली आहे ज्याने शेती कचऱ्याचा फायदेशीर वापर, ग्रामीण सक्षमीकरण आणि कार्बन फूटप्रिंट कमी होऊ शकेल.
व्हिजन
बायोमास, बायोफ्यूल्स आणि इतर बायो-प्रॉडक्ट्ससाठी एक विश्वसनीय, सर्वांगीण सप्लाय चेनच्या मार्फत ग्रीन इकॉनॉमीचे सक्षमीकरण.
उद्दिष्ट
- बायोमास आणि बायोफ्यूल व्यापारांसाठी बाजार प्रवेश आणि पोहोच सोपी करणे.
- बायोमास , बायोफ्यूल आणि बायो प्रॉडक्ट्ससाठी कार्यक्षम आणि विश्वसनीय लॉजिस्टिक्स तयार करणे.
- प्लॅटफॉर्म सदस्यांसाठी सुलभ फायनान्सिंग आणि डिजिटल सेटलमेंट सुविधा पुरविणे.
आमचा हेतू
बायोफ्यूलसर्कल प्रायव्हेट लिमिटेड, भारतातील पुणे येथील कंपनी असून, ती जून २०२० मध्ये स्थापन झाली आहे. ही कंपनी, स्टार्ट-अप-इंडिया कार्यक्रमांतर्गत स्टार्ट-अप म्हणून नोंदणीकृत आहे. एक विश्वसनीय अणि किफायती बायोएनर्जी सप्लाय चेन तयार करण्याची प्रबळ इच्छा आणि गरज हे बायोफ्यूलसर्कलच्या निर्मितीमागचे मुख्य कारण होते.
दरवर्षी सुमारे २३५ दशलक्ष टन शेत-कचरा भारतात वाया जातो.
ह्या शेत-कचऱ्यामध्ये भारताची १७% ऊर्जेची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे, परंतु यातील ७०% पेक्षा जास्त कचरा विविध कारणांमुळे जाळला जातो किंवा वाया जातो.
विखुरलेले ग्रामीण स्रोत:
लहान आणि विखुरलेल्या जमिनींमुळे शेत कचरा एकत्र गोळा करणे अवघड जाते.
कमी आर्थिक मदत :
ग्रामीण सदस्यांना पिकांचे अवशेष जाळणे टाळण्यासाठी खूपच कमी आर्थिक प्रोत्साहन मिळते.
हंगामी उपलब्धता:
साठवणीचा अवाजवी खर्च आणि ग्रामीण पुरवठादारांना औद्योगिक ग्राहकांशी थेट संपर्क साधता न येणे.
आम्ही या संधीचा उपयोग करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरून एक व्यवहार्य मॉडेल तयार करू इच्छितो. बायोफ्यूलसर्कल प्लॅटफॉर्म बायोमास, बायोफ्यूल्स आणि बायो-प्रॉडक्ट्ससाठी शेवटपर्यंत संपूर्ण सुविधा प्रदान करतो. ह्या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही योग्य ग्राहकांपर्यंत पोहचू शकता आणि लॉजिस्टिक्सच्या समस्यांचेही निराकरण करू शकता.
ह्यामुळे बायोएनर्जीसाठी एक विश्वासार्ह सप्लाय चेन निर्माण होते आणि व्यवसायांच्या बाजारातील सहभागही वाढायला मदत होते.
कंपनी
बायोफ्यूलसर्कल प्रायव्हेट लिमिटेड जून २०२० मध्ये स्थापन करण्यात आली. कंपनीच्या संस्थापक सदस्यांनी त्यांचा विविध क्षेत्रातील समृद्ध अनुभव एकत्र आणला आहे. प्रारंभिक टप्प्यातील उद्यम गुंतवणूकदारांच्या सहाय्याने, ही कंपनी बायोमास आधारित ऊर्जा संक्रमणात मजबूत स्थान निर्माण करण्याच्या मार्गावर आहे.
भारताच्या ५ राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या या कंपनीने २०,००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना १,००० हून अधिक व्यावसायिक ग्राहकांशी जोडले आहे. वार्षिक २.५ लाख मेट्रिक टन बायोमास व्यवहारांद्वारे, बायोफ्यूलसर्कल दरवर्षी प्लॅटफॉर्मवर २०० कोटी रुपयांहून अधिक व्यवहार करते.
बायोफ्यूलसर्कलचे मुख्यालय पुण्यात आहे आणि सध्या पुणे, अहमदाबाद, नोएडा आणि चेन्नई येथे कार्यालये आहेत. उत्पादन विकास, प्लॅटफॉर्म ऑपरेशन्स आणि ग्राहक सेवांमध्ये सध्या कंपनीची ५५ लोकांची टीम कार्यरत आहे. पुढील काही महिन्यांत, नवनवीन ठिकाणी आणि अधिक राज्यांमध्ये विस्तार करत असताना, कंपनी मनुष्यबळ दुप्पट करणार आहे.
जून २०२० मध्ये स्थापन झाल्यापासून, कंपनीने बायोमास सप्लाय चेनमधील औद्योगिक आणि ग्रामीण भागधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम पद्धतशीरपणे केले आहे. काही प्रमुख भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बायोफ्यूलसर्कलवर त्यांच्या हरित ऊर्जा व्यवसायासाठी विश्वास ठेवला आहे.
बायोफ्यूलसर्कलने NTPC स्टार्टअप चॅलेंज मध्ये बायोमास एक्सचेंजसाठी विजेतेपद मिळवले आहे. याव्यतिरिक्त MNRE, MoRTH, पर्यावरण, वन आणि हवामान संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या समर्थनाने त्यांच्या अनोख्या मॉडेलसाठी इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड प्राप्त केले आहे.
बायोफ्यूलसर्कल डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सप्लाय नेटवर्क
आमचे सोलूशन्स डिजिटलायझेशन आणि ग्रामीण उद्योगांच्या सहभागाने एक मजबूत व्यवस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतात.
डिजिटलायझेशनचा उद्देश सर्वसमावेशकता निर्माण करणे, सहभागास प्रोत्साहन देणे आणि साधेपणा व कार्यक्षमता सुनिश्चित करणे आहे. फ्रॅंचायझी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या ग्रामीण व्यवसायांच्या नेटवर्कच्या रूपाने बायोफ्यूलसर्कलच्या सोलूशन्सने एक अशी सप्लाय चेन तयार केली आहे, जी विश्वसनीय असून योग्य किंमतही देऊ करते.
डिजिटल प्लॅटफॉर्म
● औद्योगिक ई-कॉमर्स
● सप्लाय चेन सेवा
सप्लाय नेटवर्क
● ग्रामीण संकलन आणि साठवणूक
● थेट शेतकऱ्यांशी संपर्क
विश्वसनीयता, योग्य किंमत आणि (सरळ व्यवहार)
Farmer Mobile App
This multi-lingual app allows the farmer to either drive in to the local warehouse or pre-book evacuation service consisting of balers/ shredders/tractors based on the need.
Rural Biomass Bank
A rural enterprise concept created around BiofuelCircle’s digital platform includes a village level enterprise carefully selected to service a cluster of 10 villages. This enterprise undertakes aggregation and storage services.
B2B E-Commerce
The E-Commerce platform from BiofuelCircle brings together industrial buyers of biomass and biofuels alongside the suppliers. The platform has replicated several business processes such as RFP based procurement, Auctions, Term Contracts and Spot Contracts tor more than 50 varieties of solid biofuels. The buyers have an option to participate on a ‘live mar etplace’ or use supply chain services offered by BiofuelCircle.
We are backed by
बायोफ्यूलसर्कलची वचनबद्धता
स्थानिक रोजगार निर्मिती
ग्रामीण अर्थव्यवस्थेला सशक्त बनवणे
हरित ऊर्जेची व्यापकता वाढवणे
ऊर्जा सुरक्षेसाठी योगदान