आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शेतीमध्ये, दरवर्षी मूळं, पेंढे, आणि काड्या यांसारख्या शेती कचऱ्याची प्रचंड प्रमाणात निर्मिती होते. हंगामी शेतीमध्ये वेळ खूपच कमी असतो, त्यामुळे शक्य तितकी जास्त पिके घेऊन वार्षिक उत्पादन वाढवण्यासाठी, शेत त्वरित साफ करणे आवश्यक असते.
शेतकरी शेतातील कृषी अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी तो जाळतात ज्यामुळे वायू प्रदूषण आणि मातीची हानी होते. हा शेतकऱ्याला सर्वात कमी खर्चाचा मार्ग वाटतो.
वास्तविक, हा कृषी कचरा ब्रिकेट्स आणि पेलेट्समध्ये रूपांतरित करून बायोमास तयार केला जाऊ शकतो, ज्याला नंतर बॉयलर गरम करण्यासाठी आणि टर्बाईन्स चालविण्यासाठी जाळले जाऊ शकते. या शिवाय, त्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) नावाचे वायू इंधन तयार केले जाऊ शकते, जे बायोफ्युल ला पर्याय आहे आणि वाहनांसाठी इंधन म्हणून आणि उष्णता निर्माण करण्याच्या क्रियांमध्ये वापरले जाऊ शकते.
जर हे कृषी कचऱ्याचे बायोमास-आधारित इंधनामध्ये रूपांतर करण्याचे कार्य शेतांच्या जवळ केले गेले, तर वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. बायोफ्यूलसर्कलच्या डिजिटल साधनांच्या मदतीने, जसे बायोमास बँक, शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) किंवा अन्य ग्रामीण उद्योगांमार्फत, शेतकरी आवश्यक ज्ञान, तंत्रज्ञान मिळवून ग्राहकांशी संपर्क साधू शकतात आणि त्यांच्या शेताजवळच कृषी कचरा प्रक्रिया युनिट्स स्थापन करू शकतात. त्यामुळे कचऱ्याचे बाजार मूल्य वाढून तो आता बायोमास म्हणून विकला जाईल.
तुमच्या गावात बायोमास उद्योग निर्मितीचे फायदे
- पेंढ्याच्या जाळपोळीला उत्तम पर्याय आणि कृषी कचऱ्याचे कार्यक्षम संकलन
- कृषी कचरा जाळून होणारे वायू प्रदूषण टाळण्याबाबतच्या सरकारी निर्देशांचे पालन
- कृषी कचरा विक्री करून शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी.
- नफा निर्माण करणारी उद्योग संधी
- स्थानिक रोजगार निर्मिती
- खाजगी वापर करून शिल्लक राहिलेल्या वेळात ट्रॅक्टर्स, कृषी उपकरणे किंवा गोदामांसाठी जागा भाड्याने देऊन शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी.
बायोफ्यूलसर्कल बायोमास उद्योगांच्या निर्मितीला समर्थन देते
बायोफ्यूल उद्योगाद्वारे उपलब्ध केलेल्या संधींचा योग्य वापर करा आपल्या एफपीओ किंवा उद्योगाचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कायमस्वरूपी वाढ साध्य करण्यासाठी.
ग्रामीण स्तरावर बायोमास उद्योग निर्माण आणि वाढवण्यासाठी विशेष डिझाइन केलेले बायोमास बँक सोल्यूशन जाणून घ्या
MNRE Video
Lorem ipsum
आमच्या सेवा
कचऱ्यातून संपत्ती
बायोमास बँक कसे कार्य करते
बायोफ्यूलसर्कलच का
शेतकरी केंद्रित
पारदर्शकता
बाजाराशी संपर्क